भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझी मेलीं बहुवरिं । तूं कां जैसा तैसा हरी

majhi melin bahuvarin | tun kan jaisa taisa hari

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
माझी मेलीं बहुवरिं । तूं कां जैसा तैसा हरी ॥१॥ विठो कैसा वांचलासि । आतां सांग मजपाशीं ॥ध्रु.॥ तुज देखतां चि माझा । बाप मेला आजा पणजा ॥२॥ आम्हां लागलेंसे पाठी । बालत्व तारुण्यें काठीं ॥३॥ तुज फावलें तें मागें । कोणी नसतां वादिलागें ॥४॥ तुका म्हणे तुझ्या अंगीं । मज देखता लागलीं औघीं ॥५॥