भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझी मज आली रोकडी प्रचीत। होऊनि फजित दुःख पावे

majhi maj ali rokadi prachit| houni phajit duhkh pave

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
माझी मज आली रोकडी प्रचीत। होऊनि फजित दुःख पावे ॥१॥ काहीं द्वेष त्याचा करितां अंतरी। व्यथा या शरीरीं बहुत झाली ॥ध्रु.॥ ज्ञानेश्वरें मज केला उपकार। स्वप्नीं सविस्तर सांगितले ॥२॥ तुका सर्वा श्रेष्ठ प्रिय आंम्हा थोर । कां जो अवतार नामयाचा ॥३॥ त्याची तुज कांही घडलीरे निंदा। म्हणोनी हे बाधा जडली तुज ॥४॥ आता एक करी सांगेन ते तुला । शरण जी त्याला निश्चयेसी ॥५॥ दर्शनेचि तुझ्या दोषा परिहार । होय तो विचार सांगितला ॥६॥ तोचि हा विश्वास धरोनि मानसी । जाय कीर्तनासी नित्य काळ ॥७॥ म्हणे रामेश्वर त्याच्या समागमे । झालें हें आराम देह माझें ॥८॥