भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझी आतां सत्ता आहे । तुम्हां पायां हे वरती

majhi atan satta ahe | tumhan payan he varati

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
माझी आतां सत्ता आहे । तुम्हां पायां हे वरती ॥१॥ एकाविण नेणें दुजा । पंढरिराजा सर्वांगें ॥ध्रु.॥ पुरवावी केली आळी । जे जे काळीं मागेन तें ॥२॥ तुका म्हणे सुटसी कैसा । धरूनि दिशा राहिलों ॥३॥