भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझी ऐकावी विनंती । ज्ञानदेव श्रेष्ठमूर्ती

majhi aikavi vinanti | dnyanadev shreshthamurti

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
माझी ऐकावी विनंती । ज्ञानदेव श्रेष्ठमूर्ती ॥१॥ तुम्ही बैसोनि अंतरी । मज जागवा निर्धारीं ॥२॥ तुम्ही सत्ताधारी । प्रपंच करावा बाहेरी ॥३॥ श्रेष्ठा ज्ञानदेवा । एका जनार्दनीं आठवा ॥४॥