भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझें मुख नामीं रंगो सर्वकाळ । गोविंद गोपाळ राम कृष्ण

majhen mukh namin rango sarvakal | govind gopal ram krushna

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
माझें मुख नामीं रंगो सर्वकाळ । गोविंद गोपाळ राम कृष्ण ॥१॥ अबद्ध चांगलें गाऊं भलतैसें । बाळ वडे जैसे मायबापा ॥२॥ तुका म्हणे मज न लवी वांकडें । मी तुझें बोबडें बाळ तान्हें ॥३॥