भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझें घोंगडें पडिलें ठायीं । माग तया पायीं सांपडला

majhen ghongaden padilen thayin | mag taya payin sampadala

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
माझें घोंगडें पडिलें ठायीं । माग तया पायीं सांपडला ॥१॥ चोर तो भला चोर तो भला । पाठिसी घातला पुंडलिकें ॥ध्रु.॥ चोर कुठोरि एके चि ठायीं । वेगळें पाहावें नलगेच कांहीं ॥२॥ आणिकांचीं ही चोरलीं आधीं । माझें तयामधीं मेळविलें ॥३॥ आपल्या आपण शोधिलें तींहीं । करीन मी ही ते चि परी ॥४॥ तुका म्हणे माझें हित चि झालें । फाटकें जाउन धडकें आलें ॥५॥