भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझे पाय तुझी डोई । ऐसें करिं गा भाक देई

majhe pay tujhi doi | aisen karin ga bhak dei

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
माझे पाय तुझी डोई । ऐसें करिं गा भाक देई ॥१॥ पाहतां तंव उफराटें । घडे तई भाग्य मोठें ॥ध्रु.॥ बहु साधन मोलाच। यासी जोडा दुजें कैचें ॥२॥ नका अनमानूं विठ्ठला । तुका म्हणे धडा जाला ॥३॥