भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझे माथां तुझा हात । तुझे पायीं माझें चित्त

majhe mathan tujha hat | tujhe payin majhen chitta

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
माझे माथां तुझा हात । तुझे पायीं माझें चित्त ॥१॥ ऐसी पडियेली गांठी । शरीरसंबंधाची मिठी ॥ध्रु.॥ येरयेरांपाशीं । सांपडोन गेलों ऐसीं ॥२॥ तुका म्हणे सेवा । माझी कृपा तुझी देवा ॥३॥