भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझा तुह्मी देवा केला अंगीकार । हें मज साचार कैसें कळे

majha tuhmi deva kela angikar | hen maj sachar kaisen kale

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
माझा तुह्मी देवा केला अंगीकार । हें मज साचार कैसें कळे ॥१॥ कां हो कांहीं माझ्या नये अनुभवा । विचारितां देवा आहें तैसा ॥ध्रु.॥ लौकिकाचा मज लाविसी आभार । शिरोरत्नभार दुःखाचा हा ॥२॥ तुका म्हणे नाहीं पालट अंतरीं । तेथें दिसे हरी ठकाठकी ॥३॥