भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझा शरणागत न दिसे केविलवाणा । ही तो लाज जाणा माझी मज

majha sharanagat na dise kevilavana | hi to laj jana majhi maj

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
माझा शरणागत न दिसे केविलवाणा । ही तो लाज जाणा माझी मज ॥१॥ एकविध भावें आलिया शरण । कर्म धर्म जाण पूर्ण त्याचें ॥२॥ समर्थाचे मुला काय खावयाची चिंता । तैसें मी त्या तत्त्वतां न विसंबें ॥३॥ एका जनार्दनीं हा माझा नेम । आणीक नाहीं वर्म भावेंविण ॥४॥