भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझा मज नाहीं । आला उबेग तो कांहीं

majha maj nahin | ala ubeg to kanhin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
माझा मज नाहीं । आला उबेग तो कांहीं ॥१॥ तुमच्या नामाची जतन । नव्हतां थोर वाटे सीण ॥ध्रु.॥ न पडावी निंदा । कानीं स्वामींची गोविंदा ॥२॥ तुका म्हणे लाज । आम्हां स्वामीचें तें काज ॥३॥