भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझा देहीं असतां डोळा । काय जालें रे गोपाळा

majha dehin asatan dola | kay jalen re gopala

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
माझा देहीं असतां डोळा । काय जालें रे गोपाळा ॥१॥ माझा डोळा गिवसोनी दीजे । मी पाऊल न सोडीं तुझें ॥२॥ डोळा मुराला डोळियांत । कवण जाणे तेथील मात ॥३॥ एका जनार्दनीं अवलीला । पाहतां त्रैलोक्य जाहला डोळा ॥४॥