भजनी मालिका
← भजनांकडे परत

मज त्याची भीड नुलंघवे देवा । जो म्हणे केशवा दास तुझा

maj tyachi bhid nulanghave deva | jo mhane keshava das tujha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मज त्याची भीड नुलंघवे देवा । जो म्हणे केशवा दास तुझा ॥१॥ मज आवडती बहु तैसे जन । करिती कीर्तन कथा तुझी ॥ध्रु.॥ सांडूनियां लाज नाचेन त्यांपुढें । आइकती कोडें नाम तुझें ॥२॥ न लगे उपचार होईन भिकारी । वैष्णवांच्या घरीं उष्टावळी ॥३॥ तुका म्हणे जाणों उचित अनुचित । विचारूनि हित तें चि करूं ॥४॥