भजनी मालिका
← भजनांकडे परत

मज ते हांसतील संत । जींहीं देखिलेती मूर्तीमंत । म्हणोनि उद्वेगलें चित्त । आहा च भक्ती ऐसा दिसें

maj te hansatil sant | jinhin dekhileti murtimant | mhanoni udvegalen chitta | aha cha bhakti aisa disen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मज ते हांसतील संत । जींहीं देखिलेती मूर्तीमंत । म्हणोनि उद्वेगलें चित्त । आहा च भक्ती ऐसा दिसें ॥१॥ ध्यानीं म्या वर्णावेति कैसे । पुढें एकीं स्तुति केली असे । तेथूनि जीव निघत नसे । ऐसिये आस लागलोंसें ॥ध्रु.॥ कासया पाडिला जी धडा । उगा चि वेडा आणि वांकडा । आम्हां लेंकरांसि पीडा । एक मागें जोडा दुस†याचा ॥२॥ सांगा कोणाचा अन्याय । ऐसें मी धरीतसें पाय । तूं तंव सम चि सकळां माय । काय अन्याय एक माझा ॥३॥ नये हा जरी कारणा । तरी कां व्यालेति नारायणा । वचन द्यावें जी वचना । मज अज्ञाना समजावीं ॥४॥ बहुत दिवस केला बोभाट । पाहातां श्रमलों ते वाट । तुका म्हणे विस्तारलें ताट । काय वीट आला नेणों स्वामीया ॥५॥