भजनी मालिका
← भजनांकडे परत

मज तयांची आवड । पुरवणें लागे त्याचें कोड । गर्भवास सांकड । तयालागी उद्धवा

maj tayanchi avad | puravanen lage tyachen kod | garbhavas sankad | tayalagi uddhava

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मज तयांची आवड । पुरवणें लागे त्याचें कोड । गर्भवास सांकड । तयालागी उद्धवा ॥१॥ घेऊनी अवतार । करी दृष्टांचा संहार माझा हा बडिवार । तयाचेनि उद्धवा ॥२॥ माझें जप तप अनुष्ठान । देव पूजा मंत्र पठण । नाना नेमादि साधन । संत माझे उद्धवा ॥३॥ मज आणिलें नामरुपा । त्याची मजवर कृपा । दाविला हो सोपा । मार्ग मज उद्धवा ॥४॥ माझा योगयाग सर्व । संत माझें वैभव । वैकुंठादि राणीव । तयाचेनि मज उद्धवा ॥५॥ ऐसें वरिष्ठ पावन । पुनीत केलें मजलागून । एका जनार्दनीं शरण । तयांसीच उद्धवा ॥६॥