भजनी मालिका
← भजनांकडे परत

मज माझा उपदेश । आणिकां नये याचा रीस

maj majha upadesh | anikan naye yacha ris

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मज माझा उपदेश । आणिकां नये याचा रीस ॥१॥ तुम्ही अवघे पांडुरंग । मी च दुष्ट सकळ चांग ॥ध्रु.॥ तुमचा मी शरणागत । कांहीं करा माझें हित ॥२॥ तुका पाय धरी । मी हें माझें दुर करीं ॥३॥