भजनी मालिका
← भजनांकडे परत

मज करुं दिली नाहीं सेवा । दाविलें देवा देहींचे

maj karun dili nahin seva | davilen deva dehinche

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मज करुं दिली नाहीं सेवा । दाविलें देवा देहींचे ॥१॥ जग व्यापक जनार्दन । सदा वसे परिपुर्ण ॥२॥ भिन्न भिन्न नाहीं मनीं । भरलासे जनीं वनीं ॥३॥ एका जनार्दनीं शरण । सर्वां ठायीं व्यापक जाण ॥४॥