भजनी मालिका
← भजनांकडे परत

मज भक्त आवडता फार । ऐसा माझा निर्धार

maj bhakta avadata phar | aisa majha nirdhar

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मज भक्त आवडता फार । ऐसा माझा निर्धार ॥१॥ भक्तांअंगीं मीच वसें । माझा भक्त मजमाजीं असे ॥२॥ मज आणलें नामरुपा । भक्त सखा माझा तो ॥३॥ एकाजनार्दनीं निर्गुण । भक्तें सगुण मज केलें ॥४॥