भजनी मालिका
← भजनांकडे परत

मागें पुढें झालों लाटा । अवघा मोटा सरळ

magen pudhen jhalon lata | avagha mota saral

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मागें पुढें झालों लाटा । अवघा मोटा सरळ ॥१॥ नाहीं कोठें रितें अंग । नित्य रंग नवा चि ॥ध्रु.॥ पोसिंद्याचे पडिलों हातीं । वोझें माती चुकली ॥२॥ जोगावलों पोटीं खर । पाठी भार वरी नाहीं ॥३॥ अवघिया मोकळ्या दिशा । नाहीं वोळसा कामाचा ॥४॥ संताचिये लोळें द्वारीं । पळती दुरी गोमाशा ॥५॥ पातोगें महाद्वारीं । वरी झुली वाकळा ॥६॥ कांहीं न साहेसा झाला । तुका नेला समर्थे ॥७॥