भजनी मालिका
← भजनांकडे परत

मागें एक पुढें एक । दोन्हीं मिळोनि विठ्ठल देख

magen ek pudhen ek | donhin miloni viththal dekh

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मागें एक पुढें एक । दोन्हीं मिळोनि विठ्ठल देख ॥१॥ ऐसा होतांची मिळाणी । दिलें संसारासी पाणी ॥२॥ एक एक पाहतां दिठी । होय विठ्ठलेसी भेटी ॥३॥ एका सांडुनि दुजा नाहीं । एका जनार्दनीं ध्याई ॥४॥