भजनी मालिका
← भजनांकडे परत

माडियेला खेळ हमामा हुंबरी । मारुनी हिरण्यकश्यपु प्रल्हाद खेळिया करी

madiyela khel hamama humbari | maruni hiranyakashyapu pralhad kheliya kari

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
माडियेला खेळ हमामा हुंबरी । मारुनी हिरण्यकश्यपु प्रल्हाद खेळिया करी ॥१॥ हुतुतुतु हुमरी हुतुतुतु हुमरी ॥धृ॥ जाउनी लंकेवरी खेळ मांडियेला । रावण कुंभकर्ण वधोनि शरणगत रक्षिला ॥२॥ माडियेला खेळ खेळें अर्जुनाचे रथीं । मारुन कौरव खेळे नानापरींची गती ॥३॥ धरुनी गोपेवेष मरियेला कंसमामा । नानापरी खेळ खेळे गोपाळांसी हमामा ॥४॥ येउनी पंढरेपुरा पुंडलिकासाठीं । एका जनार्दनीं कर ठेवुनीं उभा राहिला काटीं ॥५॥