भजनी मालिका
← भजनांकडे परत

लेकुराचे हित

lekurache hit

लेकुराचे हित। वाहे माउलीचें चित्त ।।१।। ऐसी कळवळ्याची जाती। करी लाभाविण प्रीति ।।२।। पोटीं भार वाहे । त्याचें सर्वस्वही साहे ।।३।। तुका म्हणे माझें । तुम्हां संतांवरी ओझें ।।४।।