भजनी मालिका
← भजनांकडे परत

क्याला मज आयो वारितेसी घरा । खेळतों सोकरा नंदाचा मी

kyala maj ayo varitesi ghara | khelaton sokara nandacha mi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
क्याला मज आयो वारितेसी घरा । खेळतों सोकरा नंदाचा मी ॥१॥ बहु दिसीं झाली यासीं मज भेटी । आतां वाटे तुटी न परावी ॥ध्रु.॥ कोवळें बोलतो मना आवरतें । डोळियाचें पातें ढापवेना ॥२॥ आजि सकळांसी आलें चोलुनियां । कां गो पाठी वांयां पुलविली ॥३॥ तुमचें तें काय खोळंबलें काज । बल्या कां गो मज कोंडा घरीं ॥४॥ तुकयाचा धनी गोकुळनायक । सरा कांहीं एक बोलतों मी ॥५॥