भजनी मालिका
← भजनांकडे परत

क्षीर मागे तया रायतें वाढी । पाधानी गधडी ऐशा नांवें

kshir mage taya rayaten vadhi | padhani gadhadi aisha nanven

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
क्षीर मागे तया रायतें वाढी । पाधानी गधडी ऐशा नांवें ॥१॥ समयो जाणां समयो जाणां । भलतें नाणां भलतेथें ॥ध्रु.॥ अमंगळ वाणी वदवी मंगळी । अशुभ वोंगळी शोभन तें ॥२॥ तुका म्हणे नेणें समयो ठाया ठाव । राहाडी ते वाव नरकाडी ॥३॥