भजनी मालिका
← भजनांकडे परत

कृष्णाविण दुजे नेणती काया वाचा । जाला पांडवांचा सहकारी

krushnavin duje nenati kaya vacha | jala pandavancha sahakari

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कृष्णाविण दुजे नेणती काया वाचा । जाला पांडवांचा सहकारी ॥१॥ वारिलें संकट भक्तांचा अंकित । धांवेचि त्वरित नाम घेतां ॥२॥ भोजनाची आस न धरा मानसीं । धांवतो त्वरेसी नाम घेतां ॥३॥ एका जनार्दनीं नामाची आवडी । घालितासे उडी वैकुंठाहुनी ॥४॥