भजनी मालिका
← भजनांकडे परत

कृष्ण हा परिचारी कृष्ण हा वेव्हारी । कृष्ण घ्या वो नारी आणिकी म्हणे

krushna ha parichari krushna ha vevhari | krushna ghya vo nari aniki mhane

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कृष्ण हा परिचारी कृष्ण हा वेव्हारी । कृष्ण घ्या वो नारी आणिकी म्हणे ॥१॥ म्हणे कृष्णाविण कैसें तुम्हां गमे । वळि हा करमे वांयांविण ॥२॥ वांयांविण तुम्हीं पिटीत्या चाकटी । घ्या गे जगजेठी क्षणभरी ॥३॥ क्षणभरी याच्या सुखाचा सोहळा । पहा एकवेळा घेऊनियां ॥४॥ याचें सुख तुम्हां कळलियावरी । मग दारोदारीं न फिराल ॥५॥ लटिकें हें तुम्हां वाटेल खेळणें । एका कृष्णाविणें आवघें चि ॥६॥ अवघ्यांचा तुम्हीं टाकाल सांगात । घेऊनि अनंत जाल राना ॥७॥ नावडे तुम्हांस आणीक बोलिलें । मग हें लागलें कृष्णध्यान ॥८॥ न करा हा मग या जीवा वेगळा । टोंकवाल बाळा आणिका ही ॥९॥ आणिका ही तुम्हा येती काकुलती । जवळी इच्छिती क्षण बैसों ॥१०॥ बैसों चला पाहों गोपाळाचें मुख। एकी एक सुख सांगतील ॥११॥ सांगे जंव ऐसी मात दसवंती । तंव धरिती चित्ती बाळा ॥१२॥ बाळा येती घरा घेउनियां जाती । नाहीं त्या परती तुका म्हणे ॥१३॥