भजनी मालिका
← भजनांकडे परत

कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर । तया नमस्कार वारंवार

krupalu udar majha dnyaneshvar | taya namaskar varanvar

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर । तया नमस्कार वारंवार ॥१॥ न पाहे यातीकुळांचा विचार । भक्त करुणाकर ज्ञानाबाई ॥२॥ भलतिया भावें शरण जातां भेटी । पाडितसे तुटी जन्मव्याधी ॥३॥ ज्ञानाबाई माझी अनाथाची माय । एका जनार्दनीं पाय वंदितसे ॥४॥