भजनी मालिका
← भजनांकडे परत

कृपाळू सज्जन तुम्ही संतजन । हें चि कृपादान तुमचें मज

krupalu sajjan tumhi santajan | hen chi krupadan tumachen maj

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कृपाळू सज्जन तुम्ही संतजन । हें चि कृपादान तुमचें मज ॥१॥ आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा । कींव माझी सांगा काकुलती ॥ध्रु.॥ अनाथ अपराधी पतिताआगळा । परि पायांवेगळा नका करूं ॥२॥ तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी । मग मज हरी उपेक्षीना ॥३॥