भजनी मालिका
← भजनांकडे परत

कृपाळु माउली उभी भीमातटीं । लागलीसे आशा जीवासी मोठी

krupalu mauli ubhi bhimatatin | lagalise asha jivasi mothi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कृपाळु माउली उभी भीमातटीं । लागलीसे आशा जीवासी मोठी ॥१॥ कई भेटेल माझा मायबाप । उजळोनी दीप ओवाळीन श्रीमुख ॥२॥ शुन्य स्थावर व्यापुनी वेगाळा राहे । एका जानार्दनीं वंदीन त्याचे पय ॥३॥