भजनी मालिका
← भजनांकडे परत

कृपाळु माधव तुं मुरारी । अच्युता अनंता श्रीहरी

krupalu madhav tun murari | achyuta ananta shrihari

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कृपाळु माधव तुं मुरारी । अच्युता अनंता श्रीहरी ॥१॥ तुम्हीं तारिलें अहिल्येसी । उद्धरिलें अजामेळासी ॥२॥ महा दोषांची दोषश्रेणीं । ती तारिली कुंटिणी ॥३॥ रामनाम जपे अनुदिनीं । शरण एका जनार्दनीं ॥४॥