भजनी मालिका
← भजनांकडे परत

कृपाळ उदार तुम्हीं संत । दीन अनाथ तारिलें

krupal udar tumhin sant | din anath tarilen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कृपाळ उदार तुम्हीं संत । दीन अनाथ तारिलें ॥१॥ हाचि महिमा ऐकिला । जीव गुंतला चरणीं ॥२॥ करा माझें समाधान । देउनी वचन अभयांचें ॥३॥ यावई फार बोलुं नेणें । उचित करणें तुम्हासी ॥४॥ एका जनार्दनें शरण । आहे मी दीन पामर ॥५॥