भजनी मालिका
← भजनांकडे परत

क्रियामतिहीन । एक मी गा तुझें दीन

kriyamatihin | ek mi ga tujhen din

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
क्रियामतिहीन । एक मी गा तुझें दीन ॥१॥ देवा करावा सांभाळ । वारीं माझी तळमळ ॥ध्रु.॥ नको माझे ठायीं । गुणदोष घालूं कांहीं ॥२॥ अपराधाच्या कोटी । तुका म्हणे घालीं पोटीं ॥३॥