भजनी मालिका
← भजनांकडे परत

कोठें गुंतलासी कोणांच्या धांवया । आली देवराया निद्रा तुज

kothen guntalasi konanchya dhanvaya | ali devaraya nidra tuj

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कोठें गुंतलासी कोणांच्या धांवया । आली देवराया निद्रा तुज ॥१॥ कोठें गुंतलासी भक्तीप्रेमसुखें । न सुटेती मुखें गोपिकांचीं ॥ध्रु.॥ काय पडिलें तुज कोणाचें संकट । दुरी पंथ वाट न चलवे ॥२॥ काय माझे तुज गुण दोष दिसती । म्हणोनि श्रीपती कोपलासी ॥३॥ काय जालें सांग माझिया कपाळा । उरला जीव डोळां तुका म्हणे ॥४॥