भजनी मालिका
← भजनांकडे परत

कोणापाशीं द्यावें माप । आपे आप राहिलें

konapashin dyaven map | ape ap rahilen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कोणापाशीं द्यावें माप । आपे आप राहिलें ॥१॥ कासयाची भरोवरी । काय दुरी जवळी ॥ध्रु.॥ एकें दाखविले दाहा । फांटा पाहा पुसून ॥२॥ तुका म्हणे सरलें वोझें । आतां माझें सकळ ॥३॥