भजनी मालिका
← भजनांकडे परत

कोणापाशीं आतां सांगों मी बोभाट । कधीं खटखट सरेल हे

konapashin atan sangon mi bobhat | kadhin khatakhat sarel he

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कोणापाशीं आतां सांगों मी बोभाट । कधीं खटखट सरेल हे ॥१॥ कोणां आराणूक होईल कोणे काळीं । आपुलालीं जाळीं उगवूनि ॥ध्रु.॥ माझा येणें दुःखें फुटतसे प्राण । न कळतां जन सुखी असे ॥२॥ भोगा आधीं मनें मानिलासे त्रास । पाहें लपायास ठाव कोठें ॥३॥ तुका म्हणे देतों देवाचें गाऱ्हाणें । माझें रिण येणें सोसियेलें ॥४॥