भजनी मालिका
← भजनांकडे परत

कोणाचिया न पडों छंदा । गोविंदासी आळवूं

konachiya na padon chhanda | govindasi alavun

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कोणाचिया न पडों छंदा । गोविंदासी आळवूं ॥१॥ बहुतांचीं बहु मतें । अवघे रिते पोकळ ॥ध्रु.॥ घटापटा ढवळी मन । होय सीण न करूं तें ॥२॥ तुका म्हणे पांडुरंग । भरूं भाग आला तो ॥३॥