भजनी मालिका
← भजनांकडे परत

कोणा मुखें ऐसी ऐकेन मी मात । चाल तुज पंढरिनाथ बोलावितो

kona mukhen aisi aiken mi mat | chal tuj pandharinath bolavito

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कोणा मुखें ऐसी ऐकेन मी मात । चाल तुज पंढरिनाथ बोलावितो ॥१॥ मग मी न धरीं आस मागील बोभाट । वेगीं धरिन वाट माहेराची ॥ध्रु.॥ निरांजिरें चित्त करितें तळमळ । केधवां देखती मूळ आलें डोळे ॥२॥ तुका म्हणे कई भाग्याची उजरी । होईल पंढरी देखावया ॥३॥