भजनी मालिका
← भजनांकडे परत

किती विवंचना करीतसें जीवीं । मन धांवडवी दाही दिशा

kiti vivanchana karitasen jivin | man dhanvadavi dahi disha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
किती विवंचना करीतसें जीवीं । मन धांवडवी दाही दिशा ॥१॥ कोणा एका भावें तुम्ही अंगीकार । करावा विचार या च साटीं ॥ध्रु.॥ इतर ते आतां लाभ तुच्छ जाले । अनुभवा आले गुणागुण ॥२॥ तुका म्हणे लागो अखंड समाधि । जावें प्रेमबोधीं बुडोनियां ॥३॥