भजनी मालिका
← भजनांकडे परत

किती तुजपाशीं देऊं परिहार । जाणसी अंतर पांडुरंगा

kiti tujapashin deun parihar | janasi antar panduranga

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
किती तुजपाशीं देऊं परिहार । जाणसी अंतर पांडुरंगा॥१॥ आतां माझें हातीं देई हित । करीं माझें चित्त समाधान॥ध्रु.॥ राग आला तरी कापूं नये मान । बाळा मायेविण कोण दुजें ॥२॥ तुका म्हणे तैसा होईल लौकिक । मागे बाळ भीक समर्थाचें ॥३॥