भजनी मालिका
← भजनांकडे परत

किती सांगों तरी नाईकती बटकीचे । पुढे सिंदळीचे रडतील

kiti sangon tari naikati batakiche | pudhe sindaliche radatil

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
किती सांगों तरी नाईकती बटकीचे । पुढे सिंदळीचे रडतील ॥१॥ नका नका करूं रांडेची संगती । नेईल अधोगती घाली यम ॥ध्रु.॥ तुका म्हणे जरी देवे नाही चाड । हाणोनि थोबाड फोडी काळ ॥२॥