भजनी मालिका
← भजनांकडे परत

किती रांडवडे । घालूनि व्हाल रे बापुडे । संसाराचे भिडे । कासावीस झालेती

kiti randavade | ghaluni vhal re bapude | sansarache bhide | kasavis jhaleti

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
किती रांडवडे । घालूनि व्हाल रे बापुडे । संसाराचे भिडे । कासावीस झालेती ॥१॥ माझ्या स्वामी शरण रिघा । कृपाळुवा पांडुरंगा । ठेवी अंगसंगा । विश्वासियां जवळी ॥ध्रु.॥ कांहीं न मागतां भलें । होईल तें चि काम केलें । नसावें आथिलें । कांहीं एका संकल्पें ॥२॥ तुका म्हणे भाव । पाववील ठायाठाव । एकविध जीव । ठेविलिया सेवेसी ॥३॥