भजनी मालिका
← भजनांकडे परत

खुंटोनियां दोरी आपणियांपाशीं । वावडी आकाशीं मोकलिली

khuntoniyan dori apaniyampashin | vavadi akashin mokalili

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
खुंटोनियां दोरी आपणियांपाशीं । वावडी आकाशीं मोकलिली ॥१॥ आपुलिया आहे मालासी जतन । गाहाणाचे ते ॠण बुडों नेणें ॥ध्रु.॥ बीज नेलें तेथें येईल अंकुर । जतन तें सारे करा याची ॥२॥ तुका म्हणे माझी निंश्चितीची सेवा । वेगळें नाहीं देवा उरों दिलें ॥३॥