भजनी मालिका
← भजनांकडे परत

खोटयाचा विकरा । येथें नव्हे कांच हिरा

khotayacha vikara | yethen navhe kanch hira

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
खोटयाचा विकरा । येथें नव्हे कांच हिरा ॥१॥ काय दावायाचें काम । उगा च वाढवावा श्रम ॥ध्रु.॥ परीक्षकाविण । मिरवों जाणों तें तें हीण ॥२॥ तुका पायां पडे । वाद पुरे हे झगडे॥३॥ ॥२॥