भजनी मालिका
← भजनांकडे परत

खेळों मनासवें जीवाच्या संवादें । कौतुक विनोदें निरांजनी

khelon manasaven jivachya sanvaden | kautuk vinoden niranjani

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
खेळों मनासवें जीवाच्या संवादें । कौतुक विनोदें निरांजनी ॥१॥ पचीं पडिलें तें रुचे वेळोवेळां । होतसे डोहळा आवडीसी ॥ध्रु.॥ एकांताचें सुख जडलें जिव्हारीं । वीट परिचारीं बरा आला ॥२॥ पाणी ऐसी बुद्धी नव्हे आतां कदा । लंपट गोविंदा झालों पायीं ॥३॥ आणीक ते चिंता न लगे करावी । नित्य नित्य नवी आवडी हे ॥४॥ तुका म्हणे धडा राहिला पडोन । पांडुरंगीं मन विसांवलें ॥५॥