भजनी मालिका
← भजनांकडे परत

खेचर खडतर । काळ कांपती असुर । नांदे भीमातीर । पंढरपुर पाटणीं

khechar khadatar | kal kampati asur | nande bhimatir | pandharapur patanin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
खेचर खडतर । काळ कांपती असुर । नांदे भीमातीर । पंढरपुर पाटणीं ॥१॥ आतां करी का रे हाकारा । सहस्रनामें एकसरा । दवडिते खेचरा । अंगसंगें धरूनी ॥ध्रु.॥ सीते झाली झडपणी । राहाणे वासुगीच्या बनीं । पावली जननी । झोंटि मोकळिया केशी ॥२॥ लाविलें कावरें । प्रल्हादा म्हैसासुरें । आली येकसरें । दांत खात रंगासी ॥३॥ वसुदेवाचीं बाळें । सात खादलीं ज्या काळें। आली भोगवेळे । तया कारणें तेथें ॥४॥ पांडवें बापुडीं । वांज केलीं फिरती वेडीं । धांवोनियां काढी । अंगसंगें त्राहाविलीं ॥५॥ नामाचें चिंतन । तेथें धांवते आपण । न विचारितां हीण । भाव देखे जयाचा ॥६॥ कुळीची कुळदेवता । तुका म्हणे आम्हां माता । काय भय भूतां । काळ यमदूताचें ॥७॥