भजनी मालिका
← भजनांकडे परत

खावे ल्यावे द्यावे । जमा खर्च तुझ्या नावे

khave lyave dyave | jama kharcha tujhya nave

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
खावे ल्यावे द्यावे । जमा खर्च तुझ्या नावे ॥१॥ आतां चुकली खटपट । झाड्या पाड्याचा बोभात ॥ध्रु.॥ आहे नाही त्याचे । आम्हां काम सांगायचे ॥२॥ तुका म्हणे चिंता । भार वाहे तुझ्या माथा ॥३॥