भजनी मालिका
← भजनांकडे परत

खाणोरीयांची पुसो घरें । जीहीं बरे पळती

khanoriyanchi puso gharen | jihin bare palati

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
खाणोरीयांची पुसो घरें । जीहीं बरे पळती॥१॥ सांगती त्या जावें वाटे । धरोनी पोटामध्यें गोष्ठी ॥धृ॥ आली गेली होती ठाया । सत्य छाया कळली ॥२॥ तुका म्हणे आपुले बळ । युक्ती काळ कारण ॥३॥