भजनी मालिका
← भजनांकडे परत

केवढा तो अहंकार । माझा तुम्हां नव्हे दूर

kevadha to ahankar | majha tumhan navhe dur

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
केवढा तो अहंकार । माझा तुम्हां नव्हे दूर ॥१॥ आतां कोण पडे पायां । तुमच्या अहो पंढरिराया ॥ध्रु.॥ कां जी कृपेनें कृपण । वेचतसे ऐसें धन ॥२॥ तुका म्हणे देवें । दुजियाचें पोतें न्यावें ॥३॥