भजनी मालिका
← भजनांकडे परत

केलिया कर्मा येत असे वांटा । अभागी करंटा मतिमंद

keliya karma yet ase vanta | abhagi karanta matimand

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
केलिया कर्मा येत असे वांटा । अभागी करंटा मतिमंद ॥१॥ जेथें राहे उभा दिसे दैन्यवाणा । चुकला भजना गोविंदाच्या ॥२॥ एका जनार्दनीं नामाच्या उच्चारा । न करितां अघोरा जाती प्राणी ॥३॥