भजनी मालिका
← भजनांकडे परत

केलें पाप जेणें दिलें आन्मोदन । दोघांसी पतन सारिके चि

kelen pap jenen dilen anmodan | doghansi patan sarike chi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
केलें पाप जेणें दिलें आन्मोदन । दोघांसी पतन सारिके चि ॥१॥ विष नवनीता विष करी संगें । दुर्जनाच्या त्यागें सर्व हित ॥ध्रु.॥ देखिलें ओढाळ निघालिया सेता । टाळावें निमित्या थैक ह्मुण ॥२॥ तुका म्हणे जोडे केल्याविण कर्म । देखतां तो श्रम न मानितां ॥३॥